a
a
Monday, May 23, 2022
नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी बदली बाबत सत्र सुरू
नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी बदली बाबत सत्र सुरू ..PRAHAR UPDATE.... नंदुरबार जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे.जिल्हा परिषद नंदुरबार याहा मोगी माता सभागृह येथे तीन दिवसांचे समुपदेशन शिबिर सुरू आहे . पहिल्या दिवशी सहा विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , सामान्य विभागाचे प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह त्या त्या विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते . सोमवारी अर्थ विभाग , बांधकाम विभाग , लघुसिंचन , ग्रामिण पाणीपुरवठा व यांत्रिकी , महिला व बालविकास यासह शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी यांच्या बदल्या झाल्या . मंगळवारी सामान्य प्रशासन , कृषी , पशुसंवर्धन , आरोग्य विभागातील आरोग्य सेवक यांच्या बदल्या होणार आहेत . मंगळवारी शेवटचा दिवस राहणार आहे . समुपदेशन शिबिरात रिक्त जागांचा तपशील दाखवून कर्मचाऱ्यांना पसंतीक्रम विचारला जातो . बदल्यांमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत . बदलीपात्रा दरम्यान , जिल्हा परिषद आवारात कर्मचाऱ्यांची गर्दी झाली होती. पारदर्शक बदल्या करण्यात येत असल्यामुळे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment