नंदुरबार दि.१८. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ साहेब व शालेय शिक्षणमंत्री मा.वर्षाताई गायकवाड व यांचे सचिव मा. चंदनशिवे साहेब व ग्रामविकास प्रशासन अधिकारी श्री.भोसले साहेब, अवर सचिव श्री. सुनिल हंजे साहेब , उपसिव श्री. वळवी साहेब तसेच इतर कक्ष अधिकारी यांची बैठक संपन्न झाली . यामध्ये प्रामुख्याने शिक्षकाच्या बदल्यासंदर्भात चर्चा झाली. बदली सॉप्टवेअर चे काम ३०% अपूर्ण असल्यामुळे साधारणतः जुलै पर्यत बदल्या होतील अशी चर्चा झाली. तसेच वस्तीशाळा शिक्षकांच्या सेवेसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. वर्ग- २ व शिक्षकांमधून मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख , विस्तार अधिकारी, ई पदोन्नती संदर्भाने देखील सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.अरुण जाधव राज्याध्यक्ष शिक्षक संघटना समन्वय समिती आदी पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली. यावेळी शालेय शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत जिल्हा परिषद शाळेतील सर्वच शिक्षकांचे वेतन वेळेवर करण्याबाबतच्या उपाययोजनांबबत, भविष्य निर्वाह निधी आणि आश्र्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
No comments:
Post a Comment