प्रहार न्यूज.... प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार

a

a
a

Thursday, June 30, 2022

शेगवे जि.प.शाळेला केंद्र सरकारचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार

शेगवे जि.प.शाळेला केंद्र सरकारचा स्वच्छ विद्यालय पुरस्कार
नंदुरबार दि.१
( प्रतिनिधी गोपाल गावीत) केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ विद्यालय पुरस्कार स्पर्धेमध्ये जिल्हयातील जिल्हा परिषद शेगवे शाळेला ग्रामीण जिल्हास्तर स्वच्छ विद्यालय पुरस्कार नवापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेगवे शाळेला सन २००२१-२२ स्वच्छ विद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . जिल्हयातील अनेक शाळांनी आॅनलाईन सर्वेक्षण नोंदणी स्वंयमुल्यमापन पूर्ण करून स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्वच्छ विद्यालय पुरस्काराची माहिती ऑनलाईन भरण्यात आली होती. त्या आधारावर जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडून क्रॉस वेरिफिकेशन करण्यात आले. त्या क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये ज्या शाळांची रेटिंग जास्त होती त्यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातून अशा ३४ शाळांची निवड करण्यात आली. पुरस्कारासाठी राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय अनुदानित व खाजगी शाळा पात्र असून जिल्ह्यातील शाळांनी यासाठी नामांकन सादर करण्यात आले होते या स्पर्धेसाठी विविध घटकांमध्ये शाळांना माहिती भरण्यात आली होती. त्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेगवे या शाळेला सब कॅटेगिरी मध्ये पाणी व्यवस्थापन व देखभाल आणि दुरुस्ती, शाळा सुधार, स्वच्छता पद्धतीमध्ये सुधार होण्यासाठी शाळा व विद्यार्थी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी शौचालय सुविधा, हात धुण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी, कोविड १९ आधारित ५९निकषांवर मुल्यमापन करण्यात आले होते.  या सब कॅटेगिरी मध्ये फाईव्ह स्टार रेंटीग मिळाली आहे व ऑल ओव्हर स्कूल मध्ये शेगवे जिल्हा परिषद शाळेला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेली आहे. नंदुरबार जिल्हा कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी कदम , उपशिक्षणाधिकारी डाॅ. युनूस पठाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार देण्यात आला आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुनिल नारायण सोनवणे व त्यांचे सहकारी राजू लक्ष्मण गावित उपस्थित होते. दोन्ही शिक्षकांनी लोकसहभागातून खूप मेहनत घेऊन शाळा अतिशय सुंदर स्वच्छ आणि देखणी केली आहे. त्यांनी सांगितले की , पुरस्काराचे श्रेय सरपंच कांतीलाल दादा गावीत, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य शामसिंग दादा गावीत, सदस्य सुरेखाताई गावीत तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा हीनुताई गावीत, उपाध्यक्ष आकाश गावीत तसेच वीर आदिवासी एकलव्य संघ नंदुरबार शाखा नवापूर तालुकाध्यक्ष कैलास गावीत, उपाध्यक्ष निखिल गावीत तसेच पालकवर्ग यांना द्यावे लागेल. असेही मत मुख्याध्यापक सुनिल सोनवणे यांनी सांगितले.
Posted by प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार at 7:59 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार
I am gopal gavit

Wednesday, June 15, 2022

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली ता.शहादा...नवागतांचे स्वागत,प्रवेशोत्सव संपन्न

15/6/2022...जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली ता.शहादा
💐📚शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले... यावेळी गावाचे उपसरपंच विनोद पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण पाटील शाळेचे मुख्याध्यापक सुदाम पाटील शाळेतील सर्व शिक्षक वृंद. अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित विद्यार्थी, पालक..
Posted by प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार at 6:36 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार
I am gopal gavit

श्री काकासाहेब विद्यामंदिर येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षणाधिकारी झालेत शैक्षणिक रथाचे सारथी

श्री काकासाहेब विद्यामंदिर येथे नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षणाधिकारी झालेत शैक्षणिक रथाचे सारथी

नंदुरबार दि.१५ गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारी मुळे बंद असलेल्या शाळा आज उन्हाळी सुट्टीनंतर सुरू होत आहेत. शासनाच्या आदेशानुसार पहिल्या दिवशी सर्वच नवागत विद्यार्थ्यांचे शाळेत वाजत-गाजत मिरवणूक काढत गुलाबपुष्प देऊन  स्वागत होत असताना श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिर येथे शाळेच्या पहिल्या दिवशी आकर्षक घोडागाडी रथ व शाळेची बस सजवत विद्यार्थ्यांना बसवून ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत प्रवेशद्वारापर्यंत आणून गुलाब पुष्प देत मोठ्या आनंदी व उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व या शैक्षणिक रथाचे सारथी होण्याची संधी मला मिळाली
ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असे मत हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशु विहार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवागतांचे स्वागत व प्रवेशोत्सव समारंभप्रसंगी नंदुरबार जिल्ह्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री सतीश चौधरी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. पुढे ते म्हणाले शाळेने पहिल्या दिवशी केलेले विद्यार्थ्यांचे स्वागत हे विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय असे आहे असेच नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी व आवड उत्साह निर्माण होईल यासाठी व विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील राहावे अशी सदिच्छा व्यक्त केली व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित संस्थेच्या संचालिका सौ.अनिता शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणातून नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सचिव तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री रुपेश चौधरी यांनी प्रास्ताविक सादर करत संस्थेच्या तसेच शाळेच्या माध्यमातून कोरोना काळात चालवलेले उपक्रम तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी शिक्षकांनी केलेले प्रयत्न व पुढील शैक्षणिक वर्षातील धोरण यांचा लेखाजोखा सादर करत शाळेच्या व संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला व  विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रवेशोत्सव समारंभात विद्यार्थ्यांना सजवलेल्या घोडाच्या रथातुन व शाळेच्या बसमध्ये बसवून प्रवेशद्वारापर्यंत वाजत-गाजत  आणण्यात आले तेथे मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत झाले.शाळेचा पहिला दिवस मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे व शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी केक कापून शाळेचा पहिला दिवस मोठ्या आनंदात साजरा केला व सर्व विद्यार्थ्यांचे तोंड गोड व्हावे म्हणून केक वाटप करण्यात आला. कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सतीश काटके व आभार प्रदर्शन श्रीमती नयना सोनवणे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री युवराज भामरे, श्री विशाल चौधरी, शेखर पाटील, रवी चौधरी, सुधाकर ठाकूर,चेतन वसईकर आदींनी सहकार्य केले.
Posted by प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार at 6:31 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार
I am gopal gavit

Friday, June 3, 2022

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२वरीष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट.

वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२१-२०२२वरीष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट.

वरीष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण अपडेट



 

शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड यांच्या समन्वयाने महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण कोर्स चे विकसन करण्यात येऊन सदर कोर्स इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दि. ०२ जुन २०२२ रोजी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर क्लाउड सेवांचे अद्यावतीकरण करत असताना सदर प्रणाली वापरण्यात वापरकर्त्यांना तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण जगभरातील वापरकर्त्यांसाठी सदर प्रणाली पुढील दोन ते तीन दिवस बंद ठेवून अधिक अद्ययावत स्वरूपात ती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

यामुळे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यांना सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी वाढवून दिला जाईल आणि इन्फोसिस स्प्रिंगबोर्डची सेवा नव्याने सुरू झाल्यावर ईमेलद्वारे कळविण्यात येईल.

सदर प्रशिक्षणाचे सर्व अपडेट व पुढील सूचना आपणास वेळोवळी https://training.scertmaha.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.

आकस्मिक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रशिक्षणार्थी यांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.


सौजन्य :-

इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड व

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Posted by प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार at 1:33 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार
I am gopal gavit
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

my school

my school

Gopal Gavit

Gopal Gavit
Teacher

gopal gavit

My photo
प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार
I am gopal gavit
View my complete profile

welcome

  • ▼  2022 (22)
    • ►  July (3)
    • ▼  June (4)
      • शेगवे जि.प.शाळेला केंद्र सरकारचा स्वच्छ विद्यालय प...
      • जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वैजाली ता.शहादा...नवागत...
      • श्री काकासाहेब विद्यामंदिर येथे नवागत विद्यार्थ्या...
      • वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण ...
    • ►  May (14)
    • ►  April (1)
  • ►  2017 (13)
    • ►  November (3)
    • ►  October (8)
    • ►  April (1)
    • ►  January (1)
  • ►  2016 (6)
    • ►  December (4)
    • ►  November (2)

Labels

  • PRAHAR UPDATE.... प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार
  • PRAHAR UPDATE..... गोपाल गावीत 9022103161📞
  • प्रहार अपडेट...9022103161..9527722072
  • प्रहार न्यूज !✍️ प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार 9022103161
  • प्रहार न्यूज नेटवर्क..... नंदुरबार 9022103161
  • प्रहार न्यूज... प्रहार शिक्षक संघटना नंदुरबार
  • प्रहार न्यूज...9022103161

welcome

WELCOME TO YOU Z.P.P.SCHOOL BIJWADI BLOGSPOT

Awesome Inc. theme. Theme images by jacomstephens. Powered by Blogger.